Kalyan Marathi Lady Beaten By Goons: कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील श्री बाल चिकित्सालयातील एका मराठी स्वागतिकेला रुग्णालयातच बेदम मारहाण करणाऱ्या बिहार प्रांतामधील परप्रांतीय गोकुळ झा या तरूणाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तरूणीला मारहाण केल्यानंतर पोलिसांनी अटक करू नये आणि आपण कोणाला ओळखू येऊ नये म्हणून आरोपी गोकुळ झा याने आपली चेहरापट्टी, गणवेश बदलून आपली मूळ ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता.