मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांच्यात नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणावरून जुंपली आहे. गिरीश महाजन यांनी एक्स अकाउंटवरून प्रफुल्ल लोढा आणि खडसे यांचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर खडसे यांनी उत्तर दिलं आहे. तो फोटो खरा आहे आणि लोढांनी महाजन यांच्या संदर्भात काही गुलाबी गप्पा माझ्याजवळ केल्या असंही ते म्हणाले.