Rupali Chakankar Targets Rohini Khadse: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा रोहिणी खडसेंवर हल्लाबोल. रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खवालकर यांना रेव्ह पार्टीतून अटक केल्याप्रकरणी बोलत असताना स्वतःवर वेळ आल्यावर समजतं अशा शब्दात खडसेंना चाकणकरांनी सुनावलं आहे. राज्य महिला आयोगावर ताशेरे ओढण्यासाठी अनेकदा रोहिणी खडसेंकडून पीडित महिलांचे भांडवल करण्यात आल्याचा आरोप सुद्धा यावेळी चाकणकर यांनी केला आहे.