Kalyan Man Falls Down From Express Train After Thief Beats His Hand To Steal Mobile: कल्याण जवळील शहाड आंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तपोवन एक्सप्रेसने दरवाजात उभा राहून प्रवास करणाऱ्या नाशिक येथील एका तरुणाच्या हातावर रेल्वे मार्गा लगत उभ्या असलेल्या अल्पवयीन चोरट्याने लोखंडी पट्टीने रविवारी जोरदार फटका मारला. या फटक्यात तरुण मोबाईलसह एक्सप्रेसजवळ रेल्वे मार्गालगत पडला. यावेळी प्रवाशाचा एक पाय एक्सप्रेसखाली आल्याने त्याला आपला एक पाय गमावावा लागला. चोरट्याने तरुणाजवळील रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळ काढला.