बेस्ट पतपेढी निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकला नाही. त्यामुळे मनपा निवडणुआधी ठाकरे बंधूंसाठी हा धक्का मानला जात आहे. ठाकरे ब्रँड फेल झाल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही.