बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २ जुलै २०२५ रोजी घडली आहे. मात्र, अद्याप मुलगी न सापडल्याने आईसह कुटुंबाने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. तर गावातीलच चार गावगुंड लोकांनी माझ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले आहे, असा आरोप कुटुंबाने केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी, SP यांनी माझ्या मुलीला शोधून द्यावं, अशी मागणी उपोषणकर्त्या कुटुंबाने केली आहे.