आम्हाला पक्की खबर आली, एकनाथ शिंदे यांना फडणवीस काम करून देत नव्हते. फडणवीस एका चॅनेलच्या व्यासपीठावर म्हणाले, मी अडवत नाही. मात्र आता आठ महिने झाले. का आरक्षण दिले नाही? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर २६ तारखेपर्यंत आपण बोलायला तयार आहोत. मात्र २७ तारखेला आंतरवाली सोडल्यानंतर पुन्हा बोलणार नाही, असा इसाराही जरांगेंनी दिला.