मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. असं असतानच सरकारनं चिपी आणि सोलापूर येथे विमानसेवेसाठी संबंधित विमान कंपनीला प्रतिप्रवासी काहीएक रक्कम देण्याचं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर भजनी मंडळांना २५ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिकट असतानाच सरकारचे हे निर्णय राज्याच्या आर्थिक शिस्तीला तिलांजली देणारे ठरतात. याबाबत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण.