मनोज जरांगे पाटील यांचं शुक्रवार पासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पाणी, जेवण याची गैरसोय झाल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. आंदोलकांचा हा उद्रेक सकाळी सीएसएमटी स्टेशन परिसरात पाहायला मिळाला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना संबोधित करताना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. हे सांगतानाच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना इशारा दिला आहे.