टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान केरळमधील भाजपाचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेसनं थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून प्रवक्त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

















