Sanjay Raut on Asia Cup Trophy Controversy: आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या विजयानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. दरम्यान पहलहाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू नये यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने खेळले गेले, आता ही स्पर्धा संपल्यानंतर पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा या संदर्भात भाष्य केले आहे.