Devendra Fadnavis: अहिल्यानगर: शहरात आज,सोमवारी सकाळी दोन गटात तणावाची घटना घडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीमार करावा लागला.दरम्यान शहरात विविध अफवा पसरल्याने तणावाचे वातावरण होते.बाजारपेठा बंद होत्या.शहरात ठिकठिकाणी गटागटांनी दोन्ही बाजूचे जमाव चर्चा करत थांबून होते. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.















