Nitin Gadkari: केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून विकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयावरून विरोधी पक्ष आणि समाजमाध्यमांवरून काहीजण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका करत आहेत. काँग्रेसने आरोप केला आहे की “गडकरी यांनी इंधन धोरणात बदल केल्याने त्यांच्या मुलांच्या कंपन्यांना लाभ होत आहे.” तर, काही तज्ज्ञ आणि विरोधक असा आरोप करत आहेत की “पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्यामुळे वाहनांचे मायलेज कमी होऊ शकते किंवा इंजिन खराब होण्याची शक्यता आहे.” या सगळ्या आरोपांवर आता गडकरी यांनी उत्तर दिलं आहे.