Mohan Bhagwat at RSS 100 Years Dussehra Melava Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव आज नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर साजरा करण्यात आहे. या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोविंद यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी संघस्वयंसेवकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अस्मानी संकट ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेलं ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वदेशीचा नारा यावर भाष्य केलं.