Uddhav Thackeray Dasara Melava: आज शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने ठाकरेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते मोहन यादव हे खास बाळासाहेबांची गाडी घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. या गाडीची मागील कित्येक वर्षांपासून सर्वत्र चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आता राज ठाकरेंच्या फोटोचा संग्रह असलेली ही गाडी ठाकरेंच्या प्रत्येक सभेला आणली जाते. आज मोहन यादव यांच्यासह त्यांचा मुलगा उद्धव यादव हे सुद्धा उपस्थित होते. ठाकरेंच्या मेळाव्याकडून एक शिवसैनिक म्हणून असलेली अपेक्षा आज त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे.