Chhagan Bhujbal: यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. या साऱ्यांचा सरकारच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे. सार्वजनिक बांधकामापासून सर्वच खात्यांना आर्थिक नियोजन कोलमडल्याचा फटका बसणार आहे. यामुळेच यंदा ‘आनंदाचा शिधा’ ही योजना राबविणे शक्य नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.