Who Is Rakesh Kishor who Threw Shoes At CJI B. R. Gavai: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात एका ७१ वर्षीय वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपी वकिलाचे नाव राकेश कुमार असे असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर, आरोपी वकील राकेश कुमार यांची सुटका करण्यात आली आहे. पण ज्यांनी थेट सरन्यायाधिशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असे वकील राकेश किशोर आहेत कोण हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.