Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आत पत्रकार परिषदेत माहिती दिली.