Kasturba Hospital Controversy: मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तके फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडले. यावरून आता वाद निर्माण झाला असून प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देण्यात गैर काय, असा सवाल मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेने केला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यावर पुस्तके फेकणाऱ्या व अपमान करणाऱ्या सहाय्यक अधिसेविका व संबंधित परिचारिका, तसेच महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.
















