Bihar Teacher Caught Without Ticket Argues With Rail TC: सध्या सोशल मीडियावर बिहारच्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ट्रेनने प्रवास करत असताना या महिलेकडे तिकीट नसल्याने तिकीट तपासनीस तिला डब्यातून बाहेर जा असं सांगतो. पण सुरुवातीच्या व्हिडिओपासून ही महिला उर्मटपणे उत्तरे देताना दिसून येते. इथपर्यंतच ही महिला न थांबता जेव्हा ट्रेन थांबते तेव्हा तिच्या पित्याला व काही नातेवाईकांना घेऊन येते आणि तिकीट तपासनीसला तुमच्या जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत तिची मजल जाते. या सगळ्या प्रकारात या टीटीईनेच आपल्यासह गैरवर्तणूक केल्याचे सुद्धा ही महिला सांगताना ऐकू येतेय. हा व्हिडीओ पाहून या प्रकाराविषयीची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.