Gautami Patil Allegations, Injured Auto Driver Daughter Angry Remarks: पुणे शहरातील नवले पुला जवळ 30 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोरात धडक दिली.त्या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.तर त्या रिक्षाचालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. दरम्यान ज्यावेळेस हा प्रकार घडला तेव्हा मी त्या गाडीत नव्हते, माझ्यावर विनाकारण आरोप लावले जात आहेत, मी त्या पीडित जखमींच्या उपचारासाठी मदत देऊ केली होती पण कुटुंबाने मदत नाकारली असं म्हणत काल याविषयी गौतमी पाटीलने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली होती. आता यावर जखमी मरगळे यांची कन्या अपर्णाला हिने गौतमीला प्रतिप्रश्न केला आहे.