Yashomati Thakur: आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त किराण्याची पिशवी पाठवली.त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली. अशातच रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. अशातच आता यशोमती ठाकूर यांनी पुन्हा रवी राणा यांच्यावर टीका केली आहे. रवी राणांच्या संपत्तीची मुख्यमंत्र्यांनी ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी देखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  