बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आहे. त्यामुळे चक्रीवादळ आलं असून या चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलं आहे. हे मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ येऊन धडकलं आहे. हे वादळ आता आंध्र प्रदेशातून पुढे जाण्यासाठी तीन ते चार तास लागणार आहेत.



















