Ahilyanagar:अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात मागील एक आठवड्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असतांना वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होतांना दिसत नसल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे. खरंतर गेल्या 10 महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात 9 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे तर अनेक शेळ्या, मेंढ्यासह एकूण 1261 जनावर मृत्यूमुखी पडले आहे. असे असताना देखील ठोस कार्यवाही होतं नसून जिल्ह्याचा वन विभागाचे हे सुस्तावलेला असून अधिकारी हे पिंजऱ्याच्या बाहेर जायला तयार नाही हे दुर्दैव असल्यामुळे आता आपणचं ज्या ठिकाणी बिबट्यांचा संचार जास्त आहे त्या ठिकाणी नाईट व्हिजन cctv कॅमेरे, नाईट व्हिजन गॉगल,ड्रोन कॅमेरे, यासाह आणखीन आधुनिक साधन घेण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातुन निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. कारण कर्मचारी काम करतात मात्र अधिकारी सुस्तावले असल्याने आता आपणचं पुढाकार घेत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.





















