Abhijeet Bichukale: साताऱ्यातील नगरपालिका निवडणूक रंगतदार होण्याची पहिलीच चाहूल लागली आहे. बिग बॉस फेम, आपल्या आगळ्या-वेगळ्या अंदाजासाठी ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर बिचुकले यांनी त्यांच्या नेहमीच्या ‘बिचुकले स्टाईल’मध्ये सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताच, साताऱ्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.













