बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि महाआघाडी यांना यश मिळू शकलेलं नाही. १०० ची संख्याही महाआघाडीला गाठता आलेली नाही. एनडीएने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार हे निश्चित आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली आहे. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
















