ठाण्यातील एका संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा अशोक सराफ यांच्या हस्ते पुरस्कार देत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार संजय केळकर सुद्धा उपस्थित होते. केळकरांचे आभार मानत असताना निवेदिता यांनी बिहारच्या यशासाठी शुभेच्छा देत आपणही कट्टर बीजेपी समर्थक असल्याची कबुली दिली. यावरून सभागृहात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून उपस्थितांनी भरघोस दाद दिली.
















