गेल्या ५० वर्षांत जगभरातील नृत्यशैलींमध्ये उत्क्रांती होऊन एक आगळीवेगळी मोहक नृत्यशैली निर्माण झाली आहे. ‘डान्स इंडिया डान्स’, ‘झलक दिखला जा’, ‘एकापेक्षा एक’ अशा लोकप्रिय झालेल्या डान्स रिअॅलिटी शोमुळे ही शैली आपल्या परिचयाची झाली आणि तुफान लोकप्रियही झाली.. येस मी कंटेम्पररी डान्स स्टाइलविषयी बोलतो आहे. टीव्हीवरच्या या लोकप्रिय शोमुळे या आधुनिक नृत्यशैलीला विद्यार्थीसुद्धा मिळाले. खरं म्हणजे कंटेम्पररी या शब्दाच्या इंग्रजी अर्थातच या शैलीचा गाभा आहे. कंटेम्पररी म्हणजेच आजच्या काळचा. कंटेम्पररी ही आजच्या काळची नृत्यशैली आहे.
पूर्वीपासून, म्हणजे साधारण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून जगभरात शास्त्रीय नृत्यशैलींना अधिक जगन्मान्यता होती. या शास्त्रीय शैलींमध्ये
क्लासिकल बॅलेच्या काटेकोर नृत्यरेषांना थोडं शिथिल करून मॉडर्न डान्सची उपज झाली असावी. मॉडर्न डान्स हे बॅलेच्या बंधनातून मिळालेलं स्वातंत्र्य होतं. जसा नृत्यकाळ पुढे सरकला तसे यात आणखी बदल झाले. मॉडर्न डान्स, क्लासिकल बॅले आणि जॅझ डान्सिंग या तीन नृत्यप्रकारांच्या फ्यूजनमधून कंटेम्पररीचा जन्म झाला.
आता लोकप्रिय टीव्ही शोच्या माध्यमातून हा प्रकार घराघरात पोचला आहे. लोकांना कंटेम्पररी हे नाव माहिती आहे. पण यामागचा इतिहास, या नृत्यशैलीविषयी काहीच माहिती त्यांना नाही. माझ्या डान्स स्टुडिओत अनेक विद्यार्थी किंवा पालक चौकशी करायला येतात. ‘कंटेम्पररी वर्ग कधी असतो?’ त्यापाठोपाठ दुसरा आणि आश्चर्यकारक प्रश्न समोरून येतो ‘कंटेम्पररी म्हणजे नेमकं काय हो?’ आता एका डान्स स्टुडिओत बसलेली व्यक्ती बसल्या जागी कंटेम्पररी ही नृत्यशैली शब्दातून कशी दाखवणार? एखादी नृत्यशैली काय आहे किंवा कशी दिसते हेच जर माहीत नसेल तर इतक्या वेगाने, एवढय़ा प्रमाणात लोक हीच शैली शिकण्यासाठी डान्स स्टुडिओत का धाव घेतात? याचं कारण म्हणजे शैलीचं नाव लक्षात राहतं, पण शैली लक्षात येत नाही. टीव्हीवर कंटेम्पररी नावानं बरंच काही बघितलेलं असतं. टी.व्ही.वर काय बघायचं आणि त्यातलं नेमकं किती लक्षात घ्यायचं याची जागरूकता आजच्या काळात नाही. हा एक वेगळाच विषय असला तरी वेगवेगळ्या नृत्यशैलींच्या इव्होल्यूशमधूनच आपल्याला कंटेम्पररी ही मोहक शैली मिळाली आहे, हे सत्य आहे.
समुद्राच्या लाटा, वाहणारा वारा, धबधबा, गावाकडची शेती, वाऱ्यावर डोलणारी पिकं इत्यादी गोष्टींचा डोळ्यांना दिसणारा नसíगक प्रवाह किंवा त्या गोष्टींची जी नसíगक लय या अनुषंगाने ही नृत्यशैली दिसते. गुरुत्वाकर्षण आणि आपलं शरीर यातलं जे ‘गिव्ह अँड टेक’ आहे त्याचं सुंदर रूप या शैलीत दिसतं. मेर्स किनघम, पीना बाऊष, विलियम फोरसिथ आणि अशा अनेक दिग्गजांनी ‘कंटेम्पररी’चा प्रसार केला. ऑपेरा संगीताचे सूर कानावर पडताच जसं मन आपोआप डोलतं, तसंच कंटेम्पररी नृत्यसंरचनेकडे रसिकांचं लक्ष वेधलं जातं. यातल्या सुबक- चपळ हालचालींकडे रसिक मंत्रमुग्ध होऊन पाहत राहतात.
फिट अँड फाइन
‘कंटेम्पररी’ फिटनेसच्या दृष्टीनं अगदी उपयुक्त शैली आहे. शरीराची चिकाटी वाढते किंवा शरीराची लवचीकता या नृत्यशैलीनं सुधारते. बऱ्याचदा यात बरंच फ्लोअर वर्क असतं, ज्यातून नर्तकाचं कसब सिद्ध होतं. मुळात ही शैली शिकणाऱ्यांना लवचीकता, चपळाई, शरीराची कोअर स्ट्रेंथ, संगीताशी सुसंगतता या गोष्टींकडे लक्ष बार्काइनं द्यावं लागतं. कंटेम्पररी किंवा बॅले या नृत्यातून तासाला ३८० ते ४५० कॅलरीज घटू शकतात. या नृत्यातून उत्तम पोश्चर, स्ट्राँग कोअर मिळतं आणि पाय मजबूत होतात. ‘कंटेम्पररी’साठीचा पोशाख अतिशय ढगळ पण तरीही मोहक हालचाली दर्शवणारा, नसíगक हालचालींना प्रोत्साहित करणारा असतो.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘कंटेम्पररी’ म्हणजे काय भाऊ?
नृत्यकलेचा एक नवीन आयाम सध्या अनेकांच्या लक्षात आलाय.. कॅलरी बर्निगसाठीचा. सध्या जमाना आहे फिटनेस डान्सचा. काय आहे हा फंडा?
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-01-2015 at 01:13 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About contemporary dance