शहरातील प्रभाग क्र. ५२ येथे मुरलीधरनगरातील मोकळ्या जागेत आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उद्यान, जॉगिंग ट्रॅक, खुला रंगमंच या कामांचे भूमिपूजन आ. नितीन भोसले यांच्या हस्ते झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी आ. भोसले यांनी मतदार संघात अधिकाधिक विकास कामे होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून नवीन नाशिक परिसरात असलेल्या मोकळ्या जागांवर विकास कामांसाठी आमदार विकास निधीतून १० लाख रुपये इतकी निधी उपलब्ध करून दिला असून परिसरातील नागरिकांनी या उद्यानाच्या देखभाल व जपणुकीकरिता पालकत्व स्वीकारावे, ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मोहन पांडे, बाळासाहेब कासार, शांताराम कोंबडे यांसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान याच प्रभागात स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाचे भूमिपूजनही आ. भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रकांत मोरे, नगरसेवक सुदाम कोंबडे, संजय नवले आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development work starts in ward