शिववरद प्रतिष्ठान आणि गौरीशंकर मित्र मंडळाच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या जाणता राजा महानाटय़ाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ आज शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात करण्यात आला. येत्या दि. येत्या दि. २७ ते १ मे दरम्यान हे प्रयोग होणार आहेत.
श्री विशाल गणपती मंदिरात महंत संगमनाथ यांच्या हस्ते मावळ्यांच्या वेशातील कार्यकर्त्यांना तिकिटे देऊन विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. तुतारी, ढोल-ताशांच्या निनादात हा प्रारंभ झाला. सुरुवातीला संयोजक समितीचे एल. जी. गायकवाड व संजय झिंजे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात येऊन महाआरती करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी तिकीट विक्रीची केंद्र आजपासून उघडण्यात आली आहे. या केंद्रांवर मिरवणुकीद्वारे जाऊन तिकिटे वितरीत करण्यात आली. मिवणुकीत घोडेस्वार सहभागी झाले होते. संयोजक वसंत लोढा, कार्याध्यक्ष किशोर डागवाले, सचिव राजाभाऊ पोतदार, अशोक बाबर, राजकुमार जोशी, पी. डी. कुलकर्णी, राजेश भरेकर आदी यावेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2013 रोजी प्रकाशित
जाणता राजा महानाटय़ाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ
शिववरद प्रतिष्ठान आणि गौरीशंकर मित्र मंडळाच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या जाणता राजा महानाटय़ाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ आज शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात करण्यात आला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-04-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janta raja play tickets are available in nagar