दक्षिण भारत जैन सभेचे ९३ वे अधिवेशन येत्या २४ व २५ नोव्हेंबर रोजी सोलापुरात होत असून या अधिवेशनाचे उद्घाटक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे हे आहेत. तर दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जैन सभेचे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.
बुधवार पेठेतील श्राविका संस्था नगरात आयोजिलेल्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. याबाबतची माहिती संयोजक डॉ. राजेश फडकुले व डॉ. रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि.२४ रोजी सकाळी १० वाजता अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते होणार असून यावेळी अध्यक्षस्थान सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर हे भूषविणार आहेत. उद्घाटन सत्रानंतर शैक्षणिक परिसंवादासह नोकरभरती मार्गदर्शन मेळावा, आर्यनंदी पुरस्काराचे वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. तर दुपारच्या सत्रात ‘जैन महिला : काल, आज आणि उद्या’ या विषयावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना होरे यांच्या अध्यक्षतेखाली विचारमंथन होणार आहे. त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर अलका राठोड व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांची उपस्थिती राहणार असल्याचे डॉ. फडकुले यांनी नमूद केले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते समारंभपूर्वक केले जाणार आहे. याप्रसंगी दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण व सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यासह माजी मंत्री कल्लप्पा आवाडे, खासदार राजू शेट्टी, प्रकाश आवाडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनस्थळी विविध नामवंतांच्या नावे प्रवेशद्वार तयार करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
दक्षिण भारत जैन सभेचे दोन दिवसीय अधिवेशन
दक्षिण भारत जैन सभेचे ९३ वे अधिवेशन येत्या २४ व २५ नोव्हेंबर रोजी सोलापुरात होत असून या अधिवेशनाचे उद्घाटक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे हे आहेत. तर दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जैन सभेचे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-11-2012 at 02:47 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South india jains two days meet