महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीचीे नाशिक विभाग पदाधिकारी दिलीप अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली रुंगटा हायस्कूल येथे निवड करण्यात आली. साहेबराव कुटे यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली. नाशिक जिल्ह्य़ातील सर्व तालुका अध्यक्ष व कार्यवाह या प्रसंगी उपस्थित होते.
 बिनविरोध निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संजय पवार, एल. डी. पगार, कार्यवाह दत्ता वाघ, सहकार्यवाह ज्ञानेश्वर वडघुले, किरण भामरे, कोषाध्यक्ष शरद निकम आदींचा समावेश आहे. महानगरप्रमुख पदी सुभाष पाटील व कार्यवाहपदी संजय पाटील यांचीही निवड करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers parishad head seat sahebrao kute elected