scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

देवेंद्र फडणवीस News

devendra fadnavis says sit to probe arson in beed during maratha quota stir

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना

दिविजा नावाची एक मुलगी आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून (RSS) सुरू केली आणि १९९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील झाले. त्यांनी नागपूरच्या राम नगर प्रभागातून त्यांची पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि १९९२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९७ मध्ये, ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले. १९९९ पासून ते २००४ पर्यंत सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.


२०१९ साली त्यांनी ‘पुन्हा येईन’ अशी घोषणा देत भाजपाचे १०५ आमदार निवडून आणले. पण शिवसेनेने निकालानंतर युती तोडल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध करण्यात अडचणी दिसत असल्यामुळे तीनच दिवसात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे २०२२ साली शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना बाजूला करून शिवसेनेवरच हक्क सांगितला. एकनाथ शिंदेंबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन केले. तसेच २०२३ मध्ये राष्ट्रवादीतून अजित पवारांना वेगळे करण्यातही त्यांनी यश मिळविले. मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असे विधान त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १३२ आमदार निवडून आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली आहे. सलग तीनवेळा भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस यांच्या नावे नोंदवला गेला आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. मात्र भाजपाला २०१९ मध्ये असलेल्या २३ जागा पुन्हा जिंकून आणण्यात अपयश आले. २८ जागा लढणाऱ्या भाजपाला केवळ ९ जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली. मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावत विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावरच विश्वास असल्याचे दाखवून दिले.


Read More
radhakrishna vikhe praises fadnavis on reservation
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे खरे शिल्पकार – राधाकृष्ण विखे

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला.

ashok chavan criticized for fadanvis appreciation post
देेवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनासाठी नांदेडमध्ये चढाओढ ! डॉ. हंबर्डे-खोमणे यांचे फलक; खासदार चव्हाणांच्या प्रतिक्रियेवर तीव्र टीका…

मराठा आंदोलनावर मौन साधणाऱ्या अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केल्याने त्यांच्यावर समाजमाध्यमांतून टीका.

OBC Reservation
OBC Reservation : ओबीसींसाठी आता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

majority maratha suicides during bjp shivsena rule nanded
मराठा आरक्षणासाठी बहुतांश आत्महत्या युती – महायुतीच्या राजवटीत ! नांदेड जिल्ह्यातील चित्र; सात वर्षांमध्ये एका मुलीसह ३० जणांचे बलिदान…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या.

राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटची मागणी मान्य केल्यानंतर जल्लोष करताना मराठा आंदोलक (छायाचित्र लोकसत्ता)
Maratha Reservation GR : मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयाबाबत कोण काय म्हणालं?

Leaders’ Reactions on Maratha Quota Decision : राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाचा मराठ्यांना काहीही फायदा होणार नाही, असा दावा अनेकांकडून…

Prime Minister Narendra Modi in Navi Mumbai tomorrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी मुंबईत

केंद्र सरकारच्या बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन समारंभ ४ सप्टेंबरला दुपारी…

Sports Minister Adv Manik Kokates position in the party has once again been strengthened
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे माणिक कोकाटे हेही पुन्हा…

ओबीसी नेते, जे याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करताना दिसत होते, त्यांचा सूर अचानक बदलला आहे. या आंदोलनाने कोणाला…

All-party celebrations in Nashik after Maratha reservation decision
Manoj Jarange Patil Protest End : मराठा आरक्षण निर्णयानंतर नाशिकमध्ये सर्वपक्षीय आनंदोत्सव…शिवसेना शिंदे गटात शांतता

सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयांचा भाजपकडून आनंदोत्सव साजरा झाला. शिवसेना शिंदे गटाच्या गोटात मात्र शांतता…

Sanjay Raut
Sanjay Raut : “भाजपाचे नेते मनोज जरांगेंची कुचेष्टाच करत आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी…”; संजय राऊत यांचं वक्तव्य काय?

मराठा समाजाच्या वेदना, क्लेश सरकारने संपवलं असेल तर आम्हीही सरकारचं अभिनंदन करु असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व अजित पवार (छायाचित्र पीटीआय)
Maharashtra Politics : मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्पुरता सुटला, पण महायुतीतील मतभेद वाढले; कारण काय? प्रीमियम स्टोरी

Mahayuti Cracks on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी दूर राहण्याची भूमिका घेतल्याने…

ताज्या बातम्या