scorecardresearch

सोन्याचे दर News

सोन्याचा दर म्हणजेच मापनानुसात सोन्याची प्रति युनिट किंमत होय. सामान्यत: प्रतिग्रॅम किंवा किलोग्रॅम या युनिट्सचा वापर सोन्याचा दर ठरवताना केला जातो. पुरवठा-मागणी, जागतिक आर्थिक परिस्थिती, भू-राजकीय घटना आणि चलनातील चढउतार यांसह अनेक घटकांद्वारे सोन्याचा दर निर्धारित केला जातो.

सोने हा पृथ्वीवरील अत्यंत मौल्यवान धातूंपैकी एक आहे. याचा वापर नाणी, दागिने तसेच गुंतवणकीचे साधन म्हणून शतकानुशतके केला जात आहे. आर्थिक अनिश्चितता, राजकीय अस्थिरता आणि चलनवाढीच्या काळात गुंतवणूकदार सोन्याच्या पर्यायाकडे वळतात. कठीण काळामध्ये सोन्याचा वापर केला जातो.

यूएस डॉलर, युरो, ब्रिटिश पाउंड आणि जपानी येन यांच्यासह विविध चलनांमध्ये सोन्याची किंमत निश्चित केली जाते. लंडन बुलियन मार्केट असोसिएशनद्वारे (LBMA) निश्चित करण्यात आलेला दर हा सोन्याच्या किमतीसाठी सर्वाधिक वापरला जाणारा बेंचमार्क आहे. दिवसातून दोन वेळा हा दर निर्धारित केला जात असतो.

एलबीएएद्वारे ठरवलेली सोन्याची किंमत ही जागतिक बाजारपेठेतील बॅंकांच्या समूहाच्या ट्रेडिंगवर अवलंबून असते. ही किंमत सोन्याच्या जागतिक बाजारपेठेद्वारे बेंचमार्क म्हणून वापरली जाते. याव्यतिरि्कत COMEX गोल्ड फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट आणि शांघाय गोल्ड एक्सचेंज गोल्ड यांचा वापर देखील सोन्याच्या दराचा बेंचमार्क म्हणून केला जातो.

सोन्याच्या दरामध्ये अल्प कालावधीमध्ये बदल होऊ शकतो. काही वेळेस एकाच दिवसात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतो. यामागे अनेक घटक कारणीभूत असतात.
१. दागिने उत्पादक, गुंतवणूकदार आणि केंद्रीय बँकांकडून होणारी मागणी.
२. महागाई, व्याज दर आणि चलन विनिमय दरांसह जागतिक आर्थिक परिस्थितीतील बदल.
३. युद्ध, नैसर्गिक आपत्ती तसेच देशांचे व्यापारसंबंधित वाद.
४. खाण उत्पादन, सोन्याच्या पुरवठ्यासह त्याचा पुनर्वापर आणि सेंट्रल बॅंक सेल्स.

सोन्याची किंमत सामान्यत: Troy ounces मध्ये नोंद केली जाते. या यूनिटचे मूल्य ३१.१ ग्रॅम इतके असते. ५ मे २०२३ पर्यंत सोन्याची किंमत USD 1,750 प्रति Troy ounces इतकी होती. सोन्याची किंमत वेगाने बदलू शकते हे समजून घ्यायले हवे. गुंतवणूक म्हणून सोन्याचा पर्याय निवडताना गुंतवणूकदारांनी सर्व घटकांचा काळजीपूर्ण विचार करणे आवश्यक आहे

सोन्याचा दर किती आहे?
सोन्याचा दर म्हणजे सोन्याच्या वजनाच्या प्रति युनिट किंमत. सोन्याचा दर Gram, Troy ounces किंवा Kilogram यानुसार स्थानिक चलनाद्वारे निश्चित केले जातो. सोन्याची किंमत ही बाजारातील सोन्याची मागणी-पुरवठा, जगभरातील विविध आर्थिक आणि भू-राजकीय घटना यांवर अवलंबून असते.

सोन्याचा दर कसा ठरवला जातो?
सोन्याची मागणी आणि त्याचा पुरवठा याचे प्रमाण, जागतिक आर्थिक परिस्थिती, भू-राजकीय घटना आणि स्थानिक चलन अशा अनेक घटकांनुसार सोन्याची किंमत ठरवली जाते. याव्यतिरिक्त, सोन्याच्या दरावर सरकारी धोरणे, महागाई दर आणि व्याजदर यांचाही प्रभाव पडतो.

सोन्याच्या दरात चढ-उतार का होतात?
सोन्याची मागणी आणि पुरवठा याच्या प्रमाणावर विविध गोष्टींचा प्रभाव पडत असतो. याशिवाय जगातील आर्थिक, राजकिय घडामोडींमुळेही सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतात. उदा. शेअर मार्केटमधील अनिश्चितता आणि राजकीय अस्थिरता यांमुळे सोन्याची मागणी वाढते. परिणामी त्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. पुन्हा त्याची मागणी कमी झाल्यास किंवा पुरवठा वाढल्याने सोन्याच्या किमतीत घट होऊ शकते.

वेगवेगळ्या देशांतील सोन्याच्या दरात फरक आहे का?
होय. चलन विनिमय दर, कर, कर्तव्ये आणि इतर नियामक घटकांमधील फरकांमुळे सोन्याचा दर देशानुसार बदलू शकतो.

सोन्याचा दर किती वेळा बदलतो?
बाजारातील चढ-उतार, मागणी-पुरवठ्यामधील बदल यांमुळे सोन्याचा दर प्रत्येक दिवशी बदत असतो. प्रचलित बाजार परिस्थितीनुसार सोन्याच्या किमतींमध्ये चढ उतार होऊ शकतात.

सोन्याचा दर सर्व प्रकारच्या सोन्यासाठी समान आहे का?
नाही. शुद्धता आणि सोन्याच्या प्रकारानुसार सोन्याचा दर बदलू शकतो. उदाहरणार्थ, उच्च शुद्धता असल्याने २४-कॅरेट सोन्याची किंमत ही २२-कॅरेट सोन्यापेक्षा जास्त असू शकते.

मी सोन्याच्या दरावर अपडेट कसे राहू शकतो?

तुम्ही आर्थिक बातम्यांच्या वेबसाइट्ससारख्या ऑनलाइन स्रोत तपासून किंवा प्रतिष्ठित सोने विक्रेत्याशी सल्लामसलत करून सोन्याच्या दराविषयी अपडेट्स मिळवू शकता. याव्यतिरिक्त, आर्थिक घडामोडींबाबत अपडेट देणारी साइट सबस्क्राइब करुन ईमेल किंवा एसएमएसद्वारे सोन्याच्या दरावरील ताजी माहिती प्राप्त करु शकता.

Read More
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: बापरे! सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने केला कहर, १० ग्रॅमचा दर ऐकून बाजारात पसरली शांतता!

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold silver price
Gold-Silver Price: रक्षाबंधनानंतर सोन्याच्या भावात मोठा उलटफेर, अचानक बदलले दर, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत आता…

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Price
Gold-Silver Price: रक्षाबंधनाच्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने उडविली खळबळ; १० ग्रॅमची किंमत पाहून ग्राहकांना बसेल धक्का

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

gold prices hit new high before raksha bandhan after us imposes 25 percent tariff on imports
जळगावमध्ये सोन्याचा उच्चांक… रक्षाबंधनापूर्वी दरात ‘इतकी’ वाढ

अमेरिकन प्रशासनाने भारतीय आयातीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर शहरातील सुवर्ण बाजारात सोन्याच्या किमती रक्षाबंधन सणापूर्वी नवीन उच्चांकावर…

Gold Price Today
Gold-Silver Price: सर्वसामान्यांना झटका! रक्षाबंधनापूर्वी सोनं महागलं, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत…

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Trumps import tariff on Indian jewellery raises job loss fears in gem industry concern among artisans and exporters
अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात… फ्रीमियम स्टोरी

करामुळे सोन्याच्या दरासह भारतातील सराफा क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाबाबत ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)ने महत्वाचे भाष्य केले आहे.

Digital gold buying starts at ₹51 via Paytm PhonePe secure gifting and investment options
फक्त ५१ रुपयांत शुद्ध सोने खरेदी करता येणार, हे पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?

सोने व्यवसायात काळानुसार अनेक स्थित्यंतरे आली. सुरुवातीला सोनाराकडून सोने खरेदी करण्यापासून ते आता डिजिटल स्वरूपात सोने खरेदी करता येते.

Gold Silver Price Today
Gold-Silver Price: रक्षाबंधनापूर्वीच सोन्याच्या दरात मोठे उलटफेर; मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत पाहून बाजारात खळबळ

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचा नवा भाव बाजारात धक्का देणारा! किंमत ऐकून डोक्याला हात लावाल, आजची १० ग्रॅमची किंमत ऐकून थांबून जाल!

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

gold prices hit new high before raksha bandhan after us imposes 25 percent tariff on imports
जळगावात सोन्याचा दणका… दरात पुन्हा ‘इतकी’ वाढ

चांदीचे दर मंगळवारी सकाळी स्थिरच होते. सोन्याच्या दरात सुरू असलेली घोडदौड लक्षात घेता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिक चांगलेच धास्तावले.

ताज्या बातम्या