scorecardresearch

हृतिक रोशन News

हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. त्याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे संपूर्ण नाव हृतिक रोशन नागरथ असे आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब चित्रपट व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्याने माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत डाव्या हातामध्ये असलेल्या अतिरिक्त अंगठ्यामुळे त्याला चिडवले जात आहे. यामुळे तो शाळेत जाणे टाळायचा. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत तो बोलताना अडखळायचा. हळूहळू त्याने या समस्यांवर मात केली. याच सुमारास हृतिकने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच ओम प्रकाश यांच्या ‘आशा’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. १९८० पासून त्याचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु झाला. कॉलेजमध्ये असताना हृतिकने त्याच्या वडिलांच्या (राकेश रोशन) करन-अर्जुन, कोयला अशा काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शन केले. २००० मध्ये राकेश रोशन यांनी हृतिक आणि अमीशा पटेल ही फ्रेश जोडी घेऊन ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात स्टार झाला. त्याच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. ‘कहो ना प्यार है’ च्या यशानंतर त्याला निर्मात्यांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढील काही वर्षांमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे चित्रपट फ्लॉप झाले. चुकीची संहिता निवडल्याने चित्रपट फ्लॉप असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो चित्रपट करताना खूप विचार करु लागला. २००६ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटामुळे त्याला पुन्हा एकदा यश गवसले. त्याने ‘धूम २’, ‘जोधा अकबर’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘क्रिश’, ‘अग्निपथ’, ‘वॉर’ अशा मोजक्या पण दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००० मध्ये त्याने सुझान खानशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हृतिक सध्या सबा आझाद या अभिनेत्रीला डेट करत आहे.Read More
Ameesha Patel and Hrithik Roshan
अमिषा पटेलने सांगितले हृतिक रोशनचे ‘ते’ सिक्रेट; म्हणाली, “तो शरीराच्या प्रत्येक भागासाठी…”

Ameesha Patel Reveal about Hrithik Rroshan Secret : “मी त्याचे कितीही कौतुक केले तरी…”, अमिषा पटेल हृतिक रोशनबद्दल म्हणाली, “आमच्या…

Hrithik Roshan Girlfriend Saba Azad Breakup With Imaad Shah
“त्याला आयुष्यातून कधीच काढू शकणार नाही”; हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडचं एक्स बॉयफ्रेंडबद्दल वक्तव्य, कोण आहे तो?

Who is Saba Azad Ex Boyfriend : सबा आझादचा एक्स बॉयफ्रेंड आहे दिग्गज अभिनेत्याचा मुलगा, त्याची आईही आहे अभिनेत्री

kareena kapoor
मृणाल ठाकूरनंतर आता करीना कपूर होतेय ट्रोल; हृतिक रोशन आणि सलमान खानबद्दल म्हणालेली, “ते खूप वाईट…”

करीना कपूरने सलमान खान आणि हृतिक रोशनबद्दल केलेली ‘ती’ कमेंट होतेय व्हायरल, म्हणालेली…

war 2 box office collection day 1 hrithik roshan junior NTR movie public review
War 2 Collection : हृतिक रोशनच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल…; प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा?

War 2 Box Office Collection Day 1 : हृतिक रोशनच्या पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली? स्वातंत्र्यदिनी कलेक्शमध्ये वाढ होण्याची…

hrithik roshan and aamir khan
आमिर खान नाही तर ‘या’ अभिनेत्याची झालेली ‘फना’ चित्रपटासाठी निवड; दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, “त्याने नकार दिला कारण…”

‘फना’ चित्रपटात आमिर खानचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळाला.

ताज्या बातम्या