लालू प्रसाद यादव News

 लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे बिहारमधील मोठे राजकारणी आहेत. १९९० ते १९९७ या काळामध्ये त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. ते २००४ ते २००९ या कालखंडामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री देखील होते. लोकसभेचे माजी खासदार असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांचा जन्म ११ जून १९४८ रोजी झाला. पुढे पटना विद्यालयामध्ये शिकत असताना त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. १९७७ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी जनता पक्षाचे लोकसभेचे सर्वात तरुण सदस्य म्हणून ते निवडून आले. 
१९९७ मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दल या पक्षाची स्थापना केली. त्यांची राजकीय कारकीर्द चारा घोटाळ्यामुळे खूप गाजली. या प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले. १७ एप्रिल २०२१ मध्ये त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. राजकारणामध्ये तरबेज असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांचे खासगी आयुष्य त्यांच्या नऊ अपत्यांमुळे नेहमी चर्चेमध्ये राहिले.Read More