scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

महाराष्ट्रातील पावसाळा Videos

महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रमुख ऋतु पाहायला मिळतात. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे या राज्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. अरबी समुद्रावरुन हे वारे प्रामुख्याने वाहत असतात. तर काही वेळेस ते केरळ – कर्नाटक राज्यांमधून पुढे पुढे येऊ शकतात. महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. याच्या किनारपट्टीलगतच गुजरातपासून सुरु झालेली सह्याद्री पर्वतरांग आढळते. सह्याद्री पर्वतांमुळे हे र्नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात. परिणामी कोकण, पुणे आणि नाशिक या प्रशासकीय विभागांमधील जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असते. या भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नद्यांची उगमस्थाने देखील आहेत. परंतु या भौगोलिक रचनेमुळे अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडूनही अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळते. Read More