scorecardresearch

प्रियांका चोप्रा News

प्रियांका चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री, गायिका आणि चित्रपट निर्माता आहे. तिचा जन्म १८ जुलै १९८२ रोजी जमशेदपूर येथे झाला. प्रियांकाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. २००० मध्ये तिने मिस वर्ल्ड या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले होते.

प्रियांकाने २००२ मध्ये ‘थमिझन’ या तामिळ चित्रपटामध्ये काम करुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ हा चित्रपट प्रियांका चोप्राचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पुढे २००८ मध्ये तिचा ‘फॅशन’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी प्रियांकाला सर्वात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही तिच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर तिने ‘बर्फी’ (२०१२), ‘मेरी कॉम’ (२०१४), ‘बाजीराव मस्तानी’ (२०१५) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

अभिनयासह प्रियांकाला गाण्याची देखील आवड आहे. तिचे ‘इन माय सिटी’ आणि ‘एक्सोटिक’ असे म्युझिक अल्बम्स प्रसिद्ध आहेत. ‘द व्हॉईस’ या कार्यक्रमामध्ये तिने परीक्षक म्हणून काम केले होते. याव्यतिरिक्त तिने २०१५-१६ मध्ये ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन देखील केले.

२०१५ मध्ये प्रियांका चोप्राने ‘क्वांटिको’ या इंग्रजी टिव्ही सीरिजद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिने अ‍ॅलेक्स पॅरिश ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘बेवॉच’ (२०१७) आणि ‘इजंट इट रोमँटिक’ (२०१९) अशा काही हॉलीवूड चित्रपटांमध्ये झळकली.

प्रियांकाने सामाजिक क्षेत्रामध्येही खूप काम केले आहे. शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्ये ती सक्रीय असते. ती युनिसेफची सदिच्छा दूत म्हणून काम करते. राष्ट्रीय संघाच्या विविध उपक्रंमांमध्ये ती सहभाग घेत असते. २०१६ मध्ये कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री या देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन प्रियांका चोप्राचा सन्मान केला होता.

२०१८ मध्ये प्रियांका चोप्राने निक जोनाससह लग्न केले. निक अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. निक आणि प्रियांका दोघेही विविध सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.

कोण आहे प्रियांका चोप्रा?
प्रियांका चोप्रा एक भारतीय अभिनेत्री, गायिका आणि चित्रपट निर्माता आहे. तिचा जन्म १८ जुलै १९८२ रोजी भारतातील जमशेदपूर येथे झाला. २००० मध्ये मॉडेलिंग करत प्रियांकाने आपल्या करिअरची सुरुवात केली.

प्रियांका चोप्रा कशासाठी ओळखली जाते?
प्रियांका चोप्राने ‘बर्फी’, ‘फॅशन’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त ‘क्वांटिको’ या अमेरिकन टिव्ही सीरिजमुळे प्रियांका लोकप्रिय आहे. अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे. प्रियांकाचे अनेक म्युझिक सिंगल्सदेखील प्रसिद्ध आहेत.

प्रियांका चोप्राला काही पुरस्कार मिळाले आहेत का?
होय. प्रियंका चोप्राने तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

प्रियांका चोप्राने काही आंतरराष्ट्रीय काम केले आहे का?
होय. प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ आणि ‘इजंट इट रोमँटिक’ अशा अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे. तिने अमेरिकन टेलिव्हिजन सीरिज ‘क्वांटिको’मध्ये देखील काम केले आहे. या सीरिजमध्ये केलेल्या कामासाठी तिला पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला होता.

प्रियांका चोप्रा विवाहित आहे का?
होय. प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये या जोडप्याने भारतात एका भव्य विवाह सोहळ्यात लग्न केले.

प्रियांका चोप्रा कोणते परोपकारी कार्य करते?
प्रियांका चोप्रा ही UNICEF सदिच्छा दूत आहे. भारतातील वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्य मिळावी, जगामध्ये लिंगभेदाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ती प्रयत्न करत असते. याशिवाय राष्ट्रीय संघाच्या आपत्ती निवारण उपक्रमांमध्येही प्रियांका सहभागी होत असते. तिने ना-नफा तत्त्वावर ‘प्रियांका चोप्रा फाउंडेशन फॉर हेल्थ अँड एज्युकेशन’ या नावाने स्वतःची संस्था देखील सुरु केली आहे. या संस्थेद्वारे भारतातील उपेक्षित लोकांना मदत केली जाते.

प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट्स कोणते आहेत?
प्रियांका चोप्राकडे ‘द मॅट्रिक्स रिझर्क्शन्स’ आणि ‘टेक्स्ट फॉर यू’ यासह अनेक आगामी चित्रपट दिसणार आहे. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये काम करण्याबरोबरच प्रियाकांने सिटाडेलची निर्मिती देखील केली आहे.

Read More
bollywood actress priyanka chopra had skin issues filmmaker prahlad akkar praised her inspiring journey struggles and success
“ती सावळी होती आणि तिची त्वचा…”, प्रसिद्ध दिग्दर्शकांचे प्रियांका चोप्राबद्दल विधान; म्हणाले, “खूप वजन…”

“प्रियांका चोप्रा आजही त्वचेसाठी…”, प्रसिद्ध दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांचं अभिनेत्रीबद्दल वक्तव्य, म्हणाले…

shahid kapoor and priyanka chopra
‘तेरी मेरी कहानी’च्या शूटिंगदरम्यान प्रियांका चोप्रा व शाहिद कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याची होती चर्चा; दिग्दर्शक म्हणाला, “ती खूप …”

Shahid Kapoor and Priyanka Chopra’s alleged relationship: “ती काम करण्यासाठी…”, प्रियांका चोप्राबद्दल दिग्दर्शकाचे वक्तव्य; म्हणाला…

Priyanka chopra posts for Rekha users saw it as Bachchan
“अरे बिचारी…”, प्रियांका चोप्राने रेखा यांच्यासाठी पोस्ट केली शेअर; नेटकरी म्हणाले, “हे तर बच्चन…”

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रेखा यांच्या एका पेंटिंगचे पोस्टर रीपोस्ट केले आहे.

akshay kumar priyanka chopra affair
“ट्विंकल खन्नाला पती अक्षय कुमार व प्रियांका चोप्राच्या अफेअरबद्दल माहित झालं, त्याने मला दीड वर्षे वाट पाहायला लावली अन्…”

Akshay Kumar relationship with Priyanka Chopra : अक्षय कुमार व प्रियांका चोप्राने ३ चित्रपट एकत्र केले, चौथ्या सिनेमाचं गाणं शूट…

priyanka chopra birthday
Entertainment News Updates: प्रियांका चोप्राने लेक व पतीबरोबर ‘इथे’ साजरा केला वाढदिवस, फोटोंमध्ये दाखवली सेलिब्रेशनची झलक

Manoranjan News Updates : मनोरंजन विश्वातील आजच्या सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

pani movie awards
सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अन्…; आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’ला मिळाले २५ पुरस्कार, सिनेमाशी प्रियांका चोप्राचं आहे खास कनेक्शन

Paani Movie : प्रियांका चोप्राचं कनेक्शन असलेला पाणी हा मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

priyanka chopra dont look for virgin wife virginity ends in one night
“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते…”, प्रियांका चोप्राचं ‘त्या’ व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण; म्हणाली, “तुम्ही स्क्रोल करता त्या…”

Priyanka Chopra reacts on Viral Post about Virginity : प्रियांका चोप्राला स्पष्टीकरण द्यायची वेळ आली, ती पोस्ट नेमकी काय? जाणून…

priyanka chopra husband nick jonas ex girlfriend singer miley cyrus recalls their break up
“तो मला सोडून गेला”, प्रियांका चोप्राच्या पतीबद्दल एक्स गर्लफ्रेंडचं वक्तव्य; म्हणाली, “खूप वाईट…”

“निक जोनासने मला सोडलं”, प्रियांका चोप्राच्या पतीबद्दल एक्स गर्लफ्रेंडचं वक्तव्य; म्हणाली…

bollywood celebrities look at Met Gala 2025
बॉलीवूड मेट फॅशन

भारतीय डिझायनर्सची डिझाइन्स जशी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर दिसायला लागली, इंटरनॅशनल फॅशन शोजमध्ये भारतीय डिझायनर्स आणि मॉडेल्सची संख्या वाढली, तशी इंटरनॅशनल मार्केटला…

shah rukh khan and priyanka chopra unknowingly recreated same outfit 19 years ago
अनपेक्षित योगायोग! शाहरुख खान-प्रियांका चोप्राकडून नकळत घडली ‘ही’ गोष्ट; १९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो आला समोर

Met Gala 2025 : १९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो पाहिलात का? शाहरुख खान-प्रियांका चोप्राने नकळत रिक्रिएट केला पुन्हा तोच लूक…