scorecardresearch

सत्यपाल मलिक Photos

सत्यपाल मलिक (Satyapal Malik) हे भारतीय राजकारणी आहेत. ते जम्मू-काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल आहेत. २०१९ मध्ये त्याच्या कारकीर्दीमध्ये जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले होते. सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी उत्तर प्रदेशमध्ये जाट कुटुंबामध्ये झाला. विज्ञान शाखेमधून पदवी मिळवून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. १९६८-६९ मध्ये विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. १९८० मध्ये त्यांनी राज्यसभेची निवडणुक जिंकली.

१९८९ मध्ये जनता दलाकडून उमेदवारी मिळवून ते खासदार बनले. १९९६ साली ते पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. पण यावेळी त्यांचा पराभव झाला. २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २०१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल बनले. २०१८ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला. पुढे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यानंतर त्यांनी गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपालपद भूषवले.
Read More
Satya Pal Malik death, Satya Pal Malik kidney failure, Satya Pal Malik UTI
12 Photos
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक ‘या’ आजारामुळे होते रुग्णालयात, ३ महिन्यांपासून सुरु होते उपचार

मे २०२५ मध्ये, मलिक यांना मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे आणि सेप्सिसमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि ते…

satyapal malik wire interview
22 Photos
“…नाहीतर अदाणी प्रकरण मोदी सरकारला संपवून टाकेल, हे वाचूच शकणार नाहीत”, वाचा सत्यपाल मलिक यांची खळबळजनक मुलाखत!

Satyapal Malik Interview: गोवा, जम्मू-काश्मीर या राज्यांचं राज्यपालपद भूषवलेले ज्येष्ठ भाजपा नेते सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी…

ताज्या बातम्या