scorecardresearch

श्रेयस अय्यर News

श्रेयस अय्यर हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ डिसेंबर १९९९ रोजी मुंबईतील चेंबूर येथे झाला. त्याचे शिक्षण माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कूल झाले आहे. तसेच तो रामनारायण पोद्दार महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. लहानपणापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शिवाजी पार्क जिमखाना येथे तो प्रशिक्षण घेत होता. याच सुमारास श्रेयसमधील कौशल्य प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी हेरले. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेत आपली क्षमता दाखवून दिली.


२०१४ मध्ये त्याला यूकेच्या ट्रेंट ब्रिज क्रिकेट संघाकडून खेळायची संधी मिळाली. या दौऱ्याच्या ३ सामन्यांमध्ये त्याने ९९ च्या सरासरीने २९७ धावा केल्या. त्यातल्या एका सामन्यामध्ये त्याने १७१ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच वर्षी श्रेयरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये झळकला. पुढे २०१४-१५ च्या रणजी स्पर्धेमध्ये मुंबई संघामध्ये त्याची निवड करण्यात आली. तेव्हा दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने चांगला खेळ करुन दाखवला. तो आजही मुंबई संघाकडून राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळत आहे. पुढे २०१८-१९ मध्ये देवधर ट्रॉफीसाठीही त्याला निवडण्यात आले. स्पर्धेतील तीन सामन्यांमध्ये त्याने १९९ धावा केल्या होत्या. तेव्हा तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता.


रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी अशा स्पर्धांमधील चांगला खेळ पाहून श्रेयसला आयपीएलमध्ये सहभागी करण्यात आले. २०१५ मध्ये आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने त्याच्यावर २.६ कोटी रुपयांची बोली लावली. २०१५ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयसला देण्यात आली. २०२१ पर्यंत तो दिल्लीच्या संघात होता. आयपीएल २०२१ सुरु असताना दुखापतींमुळे त्याला उपचार घेण्यासाठी जावे लागले. २०२२ च्या आयपीएल लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटी बोली लावत त्याला संघात सामील केले.


२०१७ मध्ये श्रेयर अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंबर २०१७ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आले होते. पुढे डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये त्याला खेळायची संधी देण्यात आली. २०२१ मध्ये त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. श्रेयसने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३२ कसोटी सामन्यांमध्ये ६२४ धावा; ४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,५९३ धावा; ६० टी-२० सामन्यांध्ये १,०४३ धावा केल्या आहेत. भारतीय संघातील युवा फळीमध्ये त्याचा समावेश होतो. भविष्यात श्रेयस आणखी चांगला खेळ दाखवेल अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. तो मध्यम फळीत चौथ्या क्रमांकावर खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये तो भारताकडून खेळू शकतो असेही म्हटले जात आहे.


Read More
rohit-sharma-shreyas-iyer
Rohit Sharma: ‘हेच खरे संस्कार’, श्रेयस अय्यरकडून ‘ती’ चूक होताच रोहित शर्माची मन जिंकणारी कृती; पाहा Video

Rohit Sharma- Sheyas Iyer Viral Video: रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

rohit sharma
Rohit Sharma: संजू सॅमसनला पाहून रोहित शर्माने केलं असं काही, श्रेयसलाही हूस आवरलं नाही; पाहा मजेशीर Video

Rohit Sharma Funny Video: भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्माने संजू सॅमसनची नक्कल केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

india tour of australia
IND vs AUS: विराट- रोहितची जोडी ‘या’ दिवशी उतरणार मैदानात! पाहा भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

India vs Australia Full Timetable; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान जाणून घ्या या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक.

Team India Selection For Australia Tour
IND vs AUS: गिलकडे कर्णधारपद, रोहित-विराट परतले! टीम इंडियाच्या सिलेक्शनमधील ‘हे’ ५ मोठे निर्णय जाणून घ्या

Team India Selection For Australia Tour: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे…

abhishek sharma
IND-A vs AUS-A: आशिया चषकातील हिरो ऑस्ट्रेलियाविरूद्ध ठरला फ्लॉप! पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा असा झाला बाद

Abhishek Sharma Wicket: भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दुसऱ्या कसोटीत अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे.

Shreyas Iyer
India A Squad: श्रेयस अय्यरकडे वनडे संघाचं कर्णधारपद! BCCI कडून भारतीय अ संघाची घोषणा

India A vs Australia A, Team India Squad: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या…

Shreyas Iyer wants break from Test cricket Due to Back Injury Informs BCCI
श्रेयस अय्यरचा कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा धक्कादायक निर्णय, BCCIला दिली माहिती

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने भारत अ संघाचे कर्णधारपद सोडत अचानक संघातून माघार घेतली. त्यानंतर आता त्याने कसोटी क्रिकेट न खेळण्याचा…

Shreyas Iyer
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचा चकित करणारा निर्णय, सामन्याच्या काही तासआधी सोडलं भारताच्या अ संघाचं कर्णधारपद

Shreyas Iyer: भारताच्या अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यापूर्वी काही तास आधी अचानक संघाची साथ सोडली आहे. यामागचं नेमकं कारण…

Shreyas Iyer Statement on Asia Cup 2025 Snub
Asia Cup 2025: “संघात निवड होण्यास पात्र असतानाही…”, श्रेयस अय्यरचं आशिया चषकासाठी संघात संधी न मिळण्याबाबत मोठं वक्तव्य

Shreyas Iyer on Asia Cup Snub: आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याबाबत श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. पाहूया…

Abhishek Nayar Bold Statement on Shreyas Iyer Asia Cup Snub
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरची लॉटरी लागणार? संघात स्थानासह कर्णधारपदाची जबाबदारीही मिळणार

Shreyas Iyer: येत्या काही दिवसात आशिया चषकात आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी श्रेयस अय्यरसाठी आनंदाची बातमी समोर येत…

ताज्या बातम्या