scorecardresearch

सुनील ग्रोवर Photos

अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोवरचा (Sunil Grover) जन्म ३ ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणामधील एका छोट्याशा गावामध्ये झाला. अभिनयाची आवड असणाऱ्या सुनीलला दिवंगत पंजाबी कॉमेडियन जसपाल भाटी यांनी पहिला ब्रेक दिला.

१९९८ मध्ये अजय देवगन-काजोलच्या ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका साकारत त्याने कलाविश्वामध्ये पदार्पण केले. त्याने हिरोपंती, गब्बर इज बॅक, भारत, बागी, गुडबाय यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमामध्ये तो ‘गुथ्थी’ हे पात्र साकारायची. त्यानंतर आलेल्या ‘द कपिल शर्मा शो’मधील ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि ‘रिंकू देवी’ या पात्रामुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने हा कार्यक्रम सोडला.

‘तांडव’, ‘सनफ्लॉवर’ या वेब सीरिजमध्ये त्याची वेगळी झलक पाहायला मिळाली. शाहरुख खान आगामी ‘जवान’ या चित्रपटामध्ये सुनील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
Salman Khan Eid Party
18 Photos
Photos : बॉलिवूडचा ‘सिकंदर’ सलमान खानच्या भव्य ईद पार्टीत सिनेकलाकारांचा मेळा, पाहा कोणी लावली उपस्थिती?

Celebrities in Salman Khan Eid Party Photo: ईदनिमित्त सलमान खानने एका पार्टीचे आयोजन केले होते ज्यामध्ये अनेक स्टार्स हजर होते.