scorecardresearch

ट्रिस्टान स्टब्स News

ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) हा दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघामधील फलंदाज आहे. २०१९-२० च्या दरम्यान ट्रिस्टन देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पदार्पण केल्यानंतर त्याने काही महिने तेथील टी-२० लीग्समध्ये सहभागी झाला. मे २०२२ मध्ये त्याला आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळाली. त्याला मुंबई इंडियन्सने संघामध्ये सामील करुन घेतले. टायमल मिल्स दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी ट्रिस्टन स्टब्सला खेळवले गेले. पुढे त्याने जून २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने खेळायला सुरुवात केली.

९ जून २०० रोजी त्याने भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० मध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे त्याने या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. आयपीएल २०२३ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
Read More
tristan stubbs
ENG vs SA: नशीब असावं तर असं! ट्रिस्टन स्टब्सची बॅट हवेत उडाली, यष्टीला लागणार इतक्यात… नेमकं काय घडलं पाहा, Video

Tristan Stubbs Viral Video: दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ट्रिस्टन स्टब्सचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.