नवी दिल्ली : सौदी अरेबियाने जुलैसाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढवल्यामुळे सोमवारी वायदेबाजारात तेलाचा प्रतिपिंप दर उच्चांकी १२० डॉलरवर पोहोचला. भारतीय चलनानुसार कच्च्या तेलाच्या दरात २९ रुपयांनी (०.३१ टक्के) वाढ झाल्याने प्रतिपिंप दर ९,२६४ रुपये झाला. खरेदीदारांच्या बोलींमुळे वायदेबाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. ओपेक प्लस या तेलउत्पादक देशांच्या संघटनेने गेल्या आठवडय़ात तेल उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतला असला तरी तेलाच्या पुरवठय़ाबाबत शंका आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-06-2022 at 05:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big increase in crude oil prices zws