स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, स्कील इंडिया या सरकारने हाती घेतलेल्या मोहिमांतून देशात डिजिटल व्यवसायाला आणि त्या क्षेत्राशी संलग्न कंपन्यांना चांगले दिवस निश्चितच आले आहेत. अमेरिकेतील कठोर व्हिसा धोरण, युरोपसह जागतिक अर्थव्यवस्थेतील नरमाईने अग्रणी माहिती—तंत्रज्ञान कंपन्यांपुढे अवघड काळ असताना, या व्यवसाय क्षेत्राने तरीही आपली वाढ क्षमता गमावलेली नाही, असे ठाम प्रतिपादन करणारी अलाइड डिजिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नितीन शहा यांच्याबरोबरची ही बातचीत..
- डिजिटायझेशन हे कशा तऱ्हेने परिवर्तन घडवून आणत आहे? त्यातून भारतीय आयटी क्षेत्रात काय बदल अपेक्षित आहेत?
हा आणखी एक होऊ घातलेला फक्त बदल नव्हे तर तो आमूलाग्र स्वरूपाचा बदल आहे. खरे तर याला डिजिटल म्हणता येईल. सबंध जगभरात डिजिटल ध्यास वाढत आहे आणि भारताने पाऊलभरही मागे न राहता योग्य समयी सुरुवात केली हे विशेष. सर्व पारंपरिक व्यवसाय आकृतीबंध आणि चौकटी मोडून त्याला जे डिजिटल रूपडे प्रदान केले जात आहे त्यातून मोठी उलथापालथ घडत आहे. जुन्या व्यवसाय पद्धतीबरोबरीने जुन्या नाममुद्रा — कंपन्या नामशेष होत आहेत. भारतातही याचे दृश्यरूप पूर्णपणे लवकरच दिसू लागेल. त्यामुळे ही अनेकांसाठी सर्वांगाने रोमांचकारक अशी वेळ, तर त्याचवेळी काहींसाठी अस्तित्वावरील संकटही आहे.
- बदल घडतोय म्हणजे नक्की काय व कोणती उत्पादने येत आहेत? त्याचे संभाव्य लाभार्थी कोण आणि त्याचा कोणाला फायदा होईल?
प्रश्न केवळ काही उत्पादनांचा नाही. अधिक महत्त्वाचे म्हणजे टोकाचे त्रासदायी दिव्य ठरलेल्या समस्यांवर सोप्या, सुलभ उपाययोजना विकसित होत आहेत. हे एकात्मिक स्वरूपाचे उपाय हे सार्वत्रिक फायद्यचेच आहेत. जसे स्मार्ट शहराचे आपण पाहू. हे शहर चकाकदार, टोलेजंग इमारती उभारून नव्याने उभे राहणार नाही. तर यातून शहरातील प्रत्येक जनजीवनाला स्मार्ट तोंडावळा मिळेल. तंत्रज्ञानाची त्यात प्रधान भूमिका असेल. त्या त्या शहराला मानवेल असे अँडॅप्टिव्ह वाहतूक व्यवस्थापन झाले तर त्याकडे केवळ रस्त्यावरील गाडय़ांची वर्दळ सुरळीत व कोणत्याही कोंडीविना होण्याच्या फायद्यपुरते पाहता येणार नाही. कार्यक्षमता, पर्यावरण, प्रदूषणमुक्तता, नागरिकांची सुरक्षितता ते प्रत्येकाच्या फायद्यचे अनेक पदर त्याला आहेत.
- भविष्यात काय घडेल याची वर्णने यापेक्षा प्रत्यक्षात काही घडल्याचे उदाहरण सांगता येईल?
अलाइड डिजिटलने मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर या नात्याने साकारलेले ‘पुणे सुरक्षित शहर प्रकल्प’ हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र शासनासाठी राबविलेल्या या प्रकल्पाचे गेल्या वर्षी मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पुणे शहराचे चार क्षेत्रात विभाजन करून व्हिडीओ कॅमेराद्वारे पाळत व देखरेखीचे तसेच त्यायोगे प्रत्यक्ष सुरक्षितताविषयक माहिती व्यवस्थापनाला सक्षम करणारी ही यंत्रणा शहराच्या सुरक्षिततेत लक्षणीय भर घालणारी ठरली आहे. यातून चोरी, वाहतूक नियमांचा भंग आणि मोठे दरोडे व खूनाच्या प्रकरणांचा छडा यशस्वीरित्या व वेगाने छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसून आले आहे. गुन्हेगारीला अल्पकाळात वेसण घालण्यास या प्रकल्पाचे नि:संशय मोठे यश आहे. किंबहुना पुण्यातील यशाच्या पाष्टद्धr(२२८र्)भूमीवर देशाच्या अन्य शहरातून या प्रकल्पाचे प्रतिरूप साकारण्यासाठी मागणी वाढली आहे.
- एकंदर माहिती—तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नजीकच्या भविष्याबद्दल काय संकेत द्याल?
जागतिक स्तरावर मंदीचे सावट अद्यप कायम आहे. नवीन ग्राहकांचे संपादन मंदावले आहे, किंबहुना आहे तो ग्राहक वर्ग टिकवून ठेवण्याला प्राथमिकता मिळाली आहे. अमेरिकी डॉलरची मजबुती ही मात्र सुखद घटना आहे. तथापि देशांतर्गत १०० पैकी २० स्मार्ट शहरांच्या योजनेवर १००,००० कोटी रुपये आणि आगामी पाच वर्षांत डिजिटल स्थित्यंतरावर एकूण ३ ते ४ लाख कोटी रुपये खर्चाच्या सरकारप्रणित योजना आहेत. या उपलब्ध संधींपैकी अधिकाधिक वाटा मिळविण्याचा आमचा प्रय असेल. देशातील ९२ शहरांत आमचे अस्तित्व या दृष्टीने पथ्यावर पडेल. शिवाय गत दोन वर्षांत येणारम्य़ा संधींना तत्पर प्रतिसाद देणारे सशक्त प्रस्ताव केंद्र आम्ही विकसित केले आहे. मोबाईल आणि स्मार्ट उपकरणांवर आधारीत माहिती—तंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण उपाययोजना व प्रणाली, त्याचप्रमाणे सायबर धोक्यांना प्रतिकार ही क्षेत्रेदेखील वाढीच्या मोठय़ा शक्यता दर्शवितात.