15 June 2022 Lucky Zodiac Signs: ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती दररोज बदलत असते. मिथुन संक्रांती १५ जून २०२२, बुधवारी आहे. मिथुन संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाला समर्पित मानला जातो. १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. बुधवारी देखील ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी १५ जूनचा दिवस लकी ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ (Taurus)

नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. पण कुटुंबापासून दूर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. वास्तूचा आनंद वाढेल. भौतिक सुखांचा विस्तार होईल. वडिलांना आरोग्याच्या समस्या असू शकतात. उत्पन्न वाढेल.

तूळ (Libra)

तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल, परंतु संयमाची कमतरता देखील असेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील.

(हे ही वाचा: १८ जूनला बनत आहे महालक्ष्मी योग, ‘या’ ४ राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल)

धनु (Sagittarius)

वाणीत गोडवा राहील, पण संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.आत्मविश्वासाची कमतरता राहील. आईला आरोग्याच्या समस्या असू शकतात. खर्च वाढतील. शिक्षणात अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक (Scorpio)

तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात.मित्रांच्या सहकार्याने परिस्थिती सुधारू शकते. आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील. पैशाची स्थिती सुधारू शकते. भावा-बहिणींकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: Shani Dev: शनि-बुधाच्या चालीमुळे ४ राशींचे उजळवणार भाग्य, आहेत नवीन नोकरीचे योग)

कुंभ (Aquarius)

कामाच्या संदर्भात तुम्हाला कुटुंबापासून दूर राहावे लागेल. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. संतापाचे क्षण आणि समाधानाच्या भावना राहतील. धनलाभाचे योग येतील.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 june mata lakshmi grace will remain on this today zodiac signs are you also lucky ttg