4th April Panchang, Ekadashi Marathi Rashi Bhavishya: आज ४ मे २०२४ ला चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. आजच्या तिथीला पूर्वा भाद्रपद नक्षत्र जागृत असणार आहे व इंद्र योग जुळून आला आहे. आजच्या दिवशी म्हणजेच शनिवारी एकादशी सुद्धा जुळून आल्याने शनीच्या कृपेसह लक्ष्मी विष्णूची सुद्धा कृपा काही राशींना लाभू शकते. आज सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. तर अशुभ असा राहू काळ सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांपासून ते १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत असणार आहे, आज चंद्र मीन राशीत उपस्थित असणार आहे. तुमच्या राशिनुरूप आजचा दिवस कसा जाईल हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-कामाची धावपळ वाढू शकते. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.

वृषभ:-आवडी निवडीबाबत लक्ष द्याल. हसत-हसत आपले मत मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. लोकांवर तुमची उत्तम छाप पडेल.

मिथुन:-कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. क्षणिक सौख्यात रमून जाल. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात दक्षता बाळगावी. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

कर्क:-क्षुल्लक वाद वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. सरकारी कामे पुढे सरकतील. जोडीदाराची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

सिंह:-प्रकृतीची हेळसांड करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. कामातील लाभाकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.

कन्या:-भांडखोर लोकांपासून दूर राहावे. कामाचा ताण जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावे. उष्णतेचे विकार संभवतात. तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो.

तूळ:-मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मैदानी खेळाची आवड जोपासाल. कामे वेळेत पार पडतील. जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो.

वृश्चिक:-वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. भाजणे, खरचटणे यांसारखे त्रास संभवतात. दिवसभर कामाचा त्रास राहील. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. संभाषण कौशल्य दाखवण्याची संधी लाभेल.

धनू:-कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल. परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. टीकेमुळे निराश होऊ नका. मनाची चंचलता अध्यात्माने दूर करण्याचा प्रयत्न करावा. अधिकारांची जाणीव ठेवावी.

मकर:-निराशाजनक विचार करू नये. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. आळस बाजूला सारून कामे करावीत. बोलताना तिखट शब्दांचा वापर कमी करावा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये.

कुंभ:-कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. चटकन रागवू नका. घाई-घाईने कोणतेही कृती करू नका. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. अवाजवी अपेक्षा बाळगू नका.

हे ही वाचा<< ३७४ दिवसांनी गुरुचे बळ वाढले; २०२५ पर्यंत वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी, व्हाल धनाचे मालक

मीन:-जुनी इच्छा पूर्णत्वास येईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल. थोरांचा मोलाचा सल्ला मिळेल. सामुदायिक वादविवादापासून दूर राहावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4th may panchang varuthini ekadashi kundali will be blessed by lakshmi vishnu mesh to meen 12 rashi bhavishya marathi astrology news svs