Buddha Purnima 2022 Shubh Muhurat: भगवान बुद्धांची जयंती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. त्यांनी जगाला पंचशील उपदेश दिले. हे पंचशील आहेत – हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका आणि मादक पदार्थ घेऊ नका.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम बुद्ध हा भगवान विष्णूचा नववा अवतार मानला जातो. असे शास्त्रात नमूद केले आहे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांसह भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांचीही पूजा केली जाते. असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढते. त्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद वाढतो. याशिवाय बुद्ध पौर्णिमेला व्रत केल्याने व्यक्तीच्या पापांचा नाश होतो आणि तो मोक्षमार्गाकडे वाटचाल करतो.

(हे ही वाचा: Lunar Eclipse 2022: ‘या’ राशींना चंद्रग्रहणामुळे करिअरमध्ये होऊ शकते प्रचंड प्रगती, धनलाभाचे आहेत योग!)

बुद्ध पौर्णिमा तिथी आणि शुभ मुहूर्त

वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा तिथी १५ मे रोजी मध्यरात्री १२.४५ पासून सुरू होईल आणि सोमवार, १६ मे रोजी रात्री ९.४३ पर्यंत चालेल. त्यामुळे १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी व्रत पाळण्यात येणार असून विधिवत पूजा करण्यात येणार आहे.

(हे ही वाचा: Zodiac Sign: ‘या’ दोन राशींच्या व्यक्तींचं नेहमीच एकमेकांशी जुळतं, विचारही पटतात!)

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddha purnima 2022 know date of vaishakh purnima 15 or 16 may ttg