• मेष:- घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. दिवस मजेत जाईल. तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. घरात टापटीप ठेवाल.
  • वृषभ:- जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.
  • मिथुन:- आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य वाढीला लागेल. घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
  • कर्क:-मनमोकळे वागाल. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. स्व‍च्छंदीपणे वागण्यावर भर द्याल. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.
  • सिंह:- मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. नामस्मरण करण्यात वेळ व्यतीत करावा. अंगभूत कलेचे योग्य कौतुक केले जाईल. जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल.
  • कन्या:- उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.
  • तूळ:- प्रतिकुलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.
  • वृश्चिक:- घशाचे विकार जाणवू शकतात. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा.
  • धनू:- स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. भावंडांचा सहवास लाभेल.
  • मकर:- चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.
  • कुंभ:- स्थावरच्या कामात यश येईल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्याल.
  • मीन:- झोपेची तक्रार कमी होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सट्टा, जुगार यातून चांगली कमाई होईल. छंद जोपासायला वेळ काढाल. अपवाद नजरेआड करावेत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 6th march 2020 scj