- मेष:-
घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. मानसिक शांतता जपावी. वरिष्ठांना नाराज करू नका. गप्पा मारण्यात दिवस घालवाल. लहानांशी मैत्री-पूर्ण वागणूक ठेवाल. - वृषभ:-
जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनातील गैरसमज दूर सारावेत. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कंजूषपणा करू नका. उगाच चिडचिडपणा करू नये. - मिथुन:-
वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. भागीदाराची बाजू समजून घ्या. शक्यतो मतभेद दर्शवू नका. वैवाहिक सौख्य जपावे. ऐहिक गोष्टींपासून दूर व्हावे. - कर्क:-
मोहाळा बळी पडू नका. मानसिक स्वास्थ्याला महत्व द्यावे. भावंडांची चिंता लागून राहील. गुरूजनांचा आशीर्वाद घ्यावा. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. - सिंह:-
खिलाडू वृत्तीत वाढ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. अतिकाळजी करू नका. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे. - कन्या:-
कौटुंबिक समस्या जाणवतील. नातेवाईकांची मदत मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रेम सौख्यात भर पडेल. मैत्रीचे संबंध दृढ होतील. - तुळ:-
वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरणात बारकाईने लक्ष घाला. वाचनाची आवड जोपासाल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा. - वृश्चिक:-
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यापारीवर्गाला चांगला लाभ होईल. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. सांपत्तिक स्थितीकडे लक्ष ठेवा. रागावर नियंत्रण ठेवावे. - धनु:-
उतावीळपणा करू नये. जोमाने कामे हाती घ्याल. आपल्याच मतावर ठाम राहाल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. - मकर:-
कामे विनाकारण अडकून पडल्यासारखी वाटतील. आध्यात्मिक ओढ वाढेल. सामाजिक बांधीलकीची जाण ठेवावी. सामुदायिक वादाकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. - कुंभ:-
मैत्रीत मतभेद आड आणू नका. दिवसभर खटपट करावी लागेल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. थोरांचा सल्ला घ्यावा लागेल. कामातून समाधान शोधाल. - मीन:-
कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्याल. काही बदल अचानक घडून येऊ शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. अधिकारी व्यक्तींमध्ये वावराल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याचे बेत आखाल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 09-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 09 february 2020 aau