Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात शुक्रदेवाला विशेष स्थान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक सुख, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक आहे. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन ही त्याची उच्च राशी आहे, तर कन्या ही कनिष्ठ राशी आहे. अशातच आता २५ डिसेंबरला शुक्र राशी परिवर्तन करुन वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळणार आहेत. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष रास –

शुक्राने राशी परिवर्तन केल्यामुळे मेष राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी यश मिळू शकते. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहू शकते. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकता. या काळात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवहारासाठी शुभ ठरु शकतो. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. तसेच आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.

कन्या रास

शुक्राच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ उत्तम ठरु शकतो. या काळात तुमचा मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी चांगले संबंध तयार होतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

वृश्चिक रास

शुक्राचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि प्रगती आणू शकते. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठीही वेळ शुभ आहे. या काळात तुमचे प्रमोशन होण्याचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

हेही वाचा – १० डिसेंबरपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु? त्रिग्रही योग बनताच भरमसाठ संपत्ती मिळण्याची शक्यता

धनु रास

हा काळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ ठरु शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवाल. या काळात तुम्हाला कामात नक्कीच यश मिळू शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good days of these zodiac signs starts from 25th december chances of advancement in business with good financial gain by lakshmi grace jap